एकाकीपण

एकटेपणाचे आरोग्यावर परिणाम होतात का म्हणून हिमांगी प्रश्न विचारत होती. अर्थात ती स्वतः एकटीच रहात असल्या कारणाने डिप्रेशन मध्ये होती. तिची अवस्था बऱ्यापैकी किचकट असून सुद्धा तिने केलेला प्रश्न अगदी वैचारिक होता.

एकटेपणा ही एक वैश्विक मानवी भावना आहे. याचे कोणतेही सामान्य कारण नाही, म्हणून संभाव्य हानी पोहचणार्‍या मनाची रोकथाम आणि उपचार हे वेगवेगळ्या प्रकारे बदलू शकतात. एकटेपणा हा माणसात राहूनही जाणवतो आणि मनावर परिणाम करतो. याची वेगवेगळी कारणे आढळून येतात.

 

१. मानसिक आजार.
२. शारीरिक व्यंग
३. न्यूनगंड. आत्मविश्वास कमी किंवा नसणे.
४. नवीन जागी स्थलांतर.
५. घरच्या व्यक्तींनी एखाद्याला वाळीत टाकणं.
६. घटस्फोट.
७. अतिजवळील व्यक्तींचा मृत्यू व त्यामुळे झालेला आघात.
८. इलेक्ट्रॉनिक मीडिया कारण असू शकते.
९. प्रेमभंग, अपेक्षाभंग.

एकाकीपणामुळे आरोग्यास होणारे धोके अधिक त्रासदायक असतात.

१. मद्यपान आणि मादक पदार्थांचा वापर.
२. मेंदूची कार्य पद्धती बदलणे.
३. अल्झायमर रोगाची वाढ.
४. असामाजिक वर्तन
५. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोक
६. स्मरणशक्ती आणि शिक्षण कमी होणे
७. औदासिन्य आणि आत्महत्या विचार.
८. ताणाची पातळी वाढणे, नेहमीं नकारात्मक विचार करण्याची वृत्ती.
९. निर्णय क्षमता कमी किंवा नाहीशी होणे.
१०. इतर व्यक्तींच्या बरोबरीने काम करण्यास असमर्थता.
११. अपूर्ण आहार, व्यायामाची कमी, लोकांकडून होणारी हेटाळणी यामुळे त्रास वाढणे.
१२. झोपेची अपूर्णता, अनियमितता.
१३. अनेक असामान्य विचार मनात येतात.

संशोधकांना असे आढळले की कमी एकाकीपणाचे प्रमाण हे विवाह, उच्च उत्पन्न आणि उच्च शैक्षणिक स्थितीशी संबंधित आहे. तर एकटेपणाचे उच्च स्तर शारीरिक आरोग्याच्या लक्षणांशी, एकटे राहणे, कमी सामाजिक नेटवर्क आणि निम्न-गुणवत्तेचे सामाजिक संबंधांशी संबंधित आहेत. एकटेपणा संक्रमक असू शकतो.

अशा एकटेपणा ला थांबवणे, व त्यावर ताबा मिळवणे शक्य होते.

 

१. समाजसेवेत भाग घेणं आणि आवडणारी गोष्ट करणे ही चांगली वृत्ती.
२. सकारात्मक गोष्टीची अपेक्षा ठेवल्यास विचार पद्धती बदलते.अवघड आहे पण हळूहळू होईल.
३. चांगले संबंध विकसित करण्यावर भर.
४. एकटेपणाची लक्षणं जाणवल्यास समुपदेशन महत्वाचे.
५. आपल्या आयुष्यावर एकाकीपणाचे होणारे परिणाम समजून घ्या.
६. शारीरिक व्यंग व मानसिक आजार यासंबंधी रेहाबिलेशन उपक्रमात सहभागी होऊन शक्य तेव्हढे एकाकीपण दूर करण्यास मदत करते.
७. पालकांनी मुलांशी संवाद साधणे आवश्यक. त्यांच्या आवडीनिवडी पाहणे.
८. तरुण वयात हा प्रश्न प्रकर्षाने जाणवतो. पालक आणि मित्र मदत करू शकतात.
९. नित्य व्यायाम, योग, धारणा मेंदु आणि मन यांना सशक्त करतात.
१०. आहार वेळेवर व पुरेशी झोप याकडे लक्ष.

एकाकीपणाची कारणे शोधून उपचार, हाच एकमेव पर्याय. हा प्रकार स्वतः आणि सभोवताली राहणाऱ्या लोकांना अती त्रासदायक असतो. वेळेवर समुपदेशन घेऊन एकाकीपणावर मात करून पुढे चालणे यातच शहाणपण. अन्यथा दुष्परिणाम होऊ शकतात आणि ते आपण समाजात पाहतो. सांगणे सोपे पण करणे अवघड असे म्हणतात, म्हणून हे कार्य मदतीशिवाय होत नाही. मदत जरूर मागा व करा. यातच कुटुंब व समाजहित आहे.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *