नावात काय चा गोंधळ!

माई आपल्या लेकाबद्दल, कृष्णा आपल्या नावाप्रमाणेच हसतमुख, नटखट, सर्वांचा लाडका आहे असे खूप काही सांगत होती. व्यक्ती परिचयाची असल्या कारणाने त्यावर विश्वास नक्कीच बसला. कदाचित तिला कृष्णामध्ये आपल्या कुटुंबाचा भक्कम पाया दिसला.  

लहान बाळाचं आपण काही हेतूने एक गोंडस असं एक घरगुती आणि दुसरे म्हणजे विचारपूर्वक पुढील आयुष्याला साजेस नाव ठेवत असतो. त्यामध्ये इतिहासातील, देवादिकांची, महापुरुषांची, वाद्य, संगीत, आवडते स्री किंवा पुरुष, जागा अशा विविध गोष्टींचा विचार करतो.

प्रत्येक बाळाची आत्या, आई वडील, आजी आजोबा किंवा भावंडं त्यासाठी खूप संशोधन सुध्दा करतात. त्यासाठी राशी किंवा अंकशास्त्र याचा वापरही होतो.

या पाठीमागे काही उद्देश असतात.

१. मुलाचे कर्तृत्व सिद्ध व्हावे. नावाप्रमाणे त्याने कृत्य करावे.

२. मुलानं त्या नावाला असलेलं देवपण, वेगळेपण आपल्यात घ्यावं व त्या प्रमाणे वागावं.

३. ज्याचे नाव दिले त्या व्यक्तीचे गुण बाळाने अंगीकृत करावे.

४. नावा पाठीमागाची भूमिका समजाऊन सांगितली जाते. त्यातून मुलाचा उध्दार व्हावा ही भूमिका.

५. मुलाकडून पालकांची अपेक्षा असते त्याप्रमाणे त्याचे नामकरण केले जाते ज्यानेकरून ‘मी जे करू शकलो नाही ते याने करून दाखवावे’.

६. नामकरण हा बाळांचा जन्मसिध्द अधिकार आहे. म्हणून त्याचे जे येईल ते नाव प्रचलित होते.

७. त्या नावापासून इतरांना किंवा बाळाला स्पूर्ती मिळावी.

थोडक्यात प्रपंच चालवताना त्याच्या नावाचा उल्लेख एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून घेतला जावा हा या पाठीमागचा उद्देश कुठेतरी असतोच. जगात असे खूप प्रचलित आणि समाजाच्या प्रगतीसाठी ज्यांनी ज्यांनी काम केले अशा व्यक्तीच्या नावाचा जास्त उपयोग केलेला दिसतो.

परंतु कित्येकदा आपल्याला दिलेल्या नावाचा उद्देश पुढे जाऊन कुठेतरी पुसून गेलेला दिसतो, विरुद्ध वागणूक होते किंवा त्याला कुठेतरी त्यांच्या विचारांना बुरशी लागलेली दिसते.

१. नावाप्रमाणे न वागणे. उदा. राम, कृष्ण, रहीम, मोहम्मद अशी देव, संत महात्मा यांचे विचार अनुकरण अशा नावाच्या व्यक्तींकडून होणे अपेक्षित असते. ते होते का हा संशोधनाचा भाग.

२. समाजाला उपयुक्त असे काम न करणे आणि त्यातून याउलट व्यवहार होणे हे दिसून येते.

३. नावाचे अपभ्रंश होऊन दिलेल्या नावाचा अपमान करणं.

४. नाव दिले की त्याचा अर्थ सुद्धा पुढे जाऊन सांगितला जातो. उदा. सानिका, म्हणजे बासरी. त्यातून अपेक्षित असते की तिच्या सुंदर आवाजाने मन मोहित व्हावे. पण प्रत्येक्षात अस घडण आवश्यक.

५. राक्षसी किंवा नकारात्मक नाव देणं टाळले जाते. पण तरीही चांगले नाव ठेवून सुध्दा राक्षसी काम केले जातात.

६. तर काहीजण समाजासमोर एक तर पाठीमागे दुसरे असे रूप पण दाखवत असतात. त्यांचं नावाप्रमाणे वागणे कित्येकदा दिसून येत नाही.

आपल्याला दिलेल्या नावाप्रमाणे आपण का वागत नाही याचे उत्तर साधं आणि सरळ आहे.

१. आपल्याला दिलेल्या नावाची समज नसणे.

२. घरातील अपोषक वातावरण.

३. सभोवालच्या परिस्थितीचा आपल्यावर होणारा परिणाम.

४. अयोग्य किंवा अपूर्ण शिक्षण.

५. समाज व्यवस्था.

६. संगतीचा परिणाम.

७. अयोग्य गुरु.

८. पैशाचा माज.

नावात काय आहे असे सेक्सपियर चे नावाजलेले वाक्य आजही प्रचलित आहे. कित्येकजण आपल्या नावाला साजेस वागत असतात परंतु काहींचा याच्याशी दूरदूरच्या संबंध नसतो. जर आपल्या नावाप्रमाणे आपले कार्य होत असेल तर फायदे तितकेच चांगले असतात; आपल्याकडून अपेक्षित अशी कामं होतात, समाजाला उपयुक्त ठरतो, घरातील वातावरण पवित्र बनतं, आपले नाव प्रचलित होते व पर्यायाने कुटुंबाचा मान वाढतो. मानसिक आणि कौटुंबिक शांती निर्माण होते.

तर आजच आपल्या नावाचं महत्त्व जाणून घेऊन पुढे जाऊन आपण काय करू शकतो ज्याने करून मन:शांती मिळेल व आपली सर्वांगीण प्रगती होईल, असे करायला हरकत नाही.

 

©श्रीकांत कुलांगे.

(मानसोपचारतज्ज्ञ)

9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *