सुनीता आणि तिचे मानसिक आरोग्य यांची सांगड घालताना एक जाणवले की तिची भावनिक अस्थिरता थोडी जास्त आहे. म्हणजे नेमके तिला काय होतेय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण या गोष्टी सर्व सामान्यपणें बऱ्याच व्यक्तींमध्ये दिसून येतात.
१. आवेग.
२. मूड बदल. लहरी स्वभाव.
३. माझा कुणीतरी त्याग करील, सोडून जाईल ही भीती.
४. अत्यंत चिंता आणि चिडचिडेपणा.
५. राग. जो कमी जास्त होत राहतो. कित्येकदा विनाकारण.
६. इतर व्यक्तींवर शंका घेणे.
७. काही करू नये असे वाटणे, हताश आणि मी नालायक अशी धारणा.
८. आत्मघाती विचार. स्वत: ची हानी
९. अस्थिर संबंध.
१०. इतर लोकांबद्दलचे आपले मत पटकन बदलणे.
११. वास्तविकते पासून दूर जात आहोत असा भास होणे.
अशा अनेक कारणांनी आपले मानसिक आरोग्य असंतुलित होते. खूप काही कारणे आहेत.
१. घरातील अपोषक वातावरण. घटस्फोटामुळे किंवा इतर काही भावनिक अस्वस्थतेमुळे कौटुंबिक ताणतणाव. आर्थिक, भावनिक अस्थिरता.
२. ड्रग्ज किंवा अल्कोहोलचा जन्मपूर्व संपर्क
३. शारीरिक आजार किंवा अपंगत्व.
४. कुपोषित जीवनशैली
५. मेंदुला दुखापत किंवा अपघात.
६. आनुवंशिक घटक
७. जीवनात किंवा शाळेबद्दल वारंवार असंतोष, नैराश्य, भीती किंवा चिंता.
ही लिस्ट वाढत जाते. काही कारणे स्वयं निर्मित असतात तर काही जन्मापासून येतात. बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय आहेत. काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?
१. चांगली झोप व नियमित व्यायाम. ध्यान धारणा.
२. सकारात्मक विचारसणी. आपला दृष्टीकोन बदल होणे आवश्यक.
३. खानपान. नकारात्मक भावनांमुळे आरोग्यास हानिकारक पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते, किंवा कित्येकदा जेवण न घेणे.
४. स्वतः ची सर्वांगीण काळजी आपल्या मनात चांगल्या भावना निर्मित करतात.
५. मानसोपचार तज्ज्ञांची मदत होते.
६. आपल्या अपेक्षा तपासा. अनेकदा जीवन सुंदर हवं म्हणुन नेहमीं अपेक्षा करतो परंतु तसं नाही. प्रॉब्लेम्स येत राहणार.
७. भावनिक अस्थिरता होऊ नये म्हणून प्लॅन तयार केल्यास त्याची सवय होते.
८. ठराविक औषधे आपल्यात मानसिक अस्थिरता निर्माण करतात म्हणून डॉक्टर बरोबर बोला.
भावनिक अस्थिरता स्वतः व बरोबर असणाऱ्या मित्रांना, समाजाला, घरातील व्यक्तींना त्रासदायक असतात. त्यामुळे आपण बहिष्कृत होण्याची शक्यता असते आणि मानसिक त्रास वाढतो. म्हणून वेळीच उपचार घेतल्यास पुढील हानी टाळू शकु. मनाची शांतता मिळण्यासाठी आजपासून आपल्या मुलांशी संवाद ठेवा, त्यांची काळजी घ्या, आणि तणावाचं नियोजन केल्यास अतिउत्तम.
©श्रीकांत कुलांगे
9890420209