अपरिपक्व भावना

सुहासचा एक मोठा प्रॉब्लेम होता. त्याची आई देवाघरी जाऊन आज बरोबर एक वर्ष झाले होते आणि अतिशय हळव्या परिस्थितीत त्याच्या भावना अनावर होऊन डोळ्यात पाणी आलेले. जेंव्हा जेंव्हा त्याला आईची आठवण यायची तेंव्हा त्याचे अश्रु वहायचे. काही मानसिक चाचण्या घेऊन त्याची भावनिक अपरिपक्वता त्याला समजाऊन सांगितली. काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे माहीत असून सुद्धा स्वतःला त्रास देणे चालूच होते. असे कित्येकदा भावनिक अपरिपक्वतेमुळे होते. म्हणजे नेमके काय की, त्यांच्या भावना प्रभावीपणे सांगता न येणे. अनेक संकेत आहेत जसे की, 

१. जास्त मोकळेपणाने बोलण्याऐवजी वरवर बोलणे. मनात एक आणि बोलणार दुसरे. वेळ मारून नेणे.

२. जर जोडीदार फक्त स्वतःचे पाहत असेल आणि तुमच्या कडे दुर्लक्ष करत असेल तर त्याच्या भावनिक पातळी बदलत आहे हे लक्षात घेणे. बऱ्याचदा आशा व्यक्ति मी आणि माझे विश्व यात गुरफुटून राहतात.

३. ते बचावात्मक बनतात. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करणे.

४. भविष्याबद्दल आखणी करण्यास सहसा तयार न होणे. कारण त्यांची स्वातंत्र्यता भंग होते की काय अशी भीती.

५. झालेल्या नुकसानीला परिस्थिति किंवा दुसऱ्याला जबाबदार धरणे.

६. एकाकीपणा जाणवणे.

७. रडणे, रागावणे आणि गैरसमज करून घेणे.

 

असे का होते? भावनिक अपरिपक्वता बर्‍याच पर्यावरणीय, वैद्यकीय आणि मानसिक कारणांमुळे होऊ शकते.

१. काही अंशी आनुवंशिकता.

२. हार्मोन्स असंतुलन

३. आघात

४. बाल शोषण

५. गर्भवती असताना मद्यपान करणं (Fetal alcohol syndrome) .

थेरपी, समुपदेशन, ठराविक औषधे आणि कुटुंबाच्या सतत पाठिंब्याबरोबरच भावनिकदृष्ट्या अपरिपक्व व्यक्ति काही कौशल्ये विकसित करू शकतात आणि यशस्वी होतात. याव्यतिरिक्त काही गोष्टी आहेत ज्याने अपरिपक्वतेवर मात करण्यास मदत होते.

१. इतरांना प्राधान्य देणे. आपल्याव्यतिरिक्त इतर प्रिय व्यक्ति आपल्या जवळ आहेत याची जाणीव ठेवायला हवी.

२. स्वत: ची काळजी. शारीरिक आणि भावनिक आरोग्याची काळजी. स्वतःकडे दुर्लक्ष केल्याने थकवा व उदासिनता निर्माण होऊ शकते.

३. इतरांना वेळ देणे. जोडीदार, नातेगोते, मुलांना, समाज यांबरोबर नाते सुधृढ करणे आवश्यक.

४. इतरांच्या नजरेतून पाहणे. तुमच्या वागण्यामुळे आपल्या जवळील कुटुंबीयांना त्रास होत असतो.

५. आपण नेहमीच बरोबर असतो हा हेका सोडून देणे व चुका स्वीकार करणे गरजेचे आहे.

६. सकारात्मक विचारसरणीचा स्वीकार.

७. समुपदेशन आणि ध्यान धारणा मनाला भरकटू देत नाही.

८. आवडत्या गोष्टीत मन रमवायला हवं. छंद जोपसण्यासाठी प्रयत्न केले तर फायदा होतो.

९. जवळील कुटुंबीयांनी मदत करणे अपेक्षित, न कंटाळता, निराश न होता प्रयत्न चालू ठेवल्यास भावना नियमन होण्यास मदत मिळते. रागवू नका. तुम्ही पण समुपदेशन घ्या.

ज्या व्यक्ती भावनिक अपरिपक्व असतात त्यांच्यात काही बदल दिसतात.

१. काही वेळा त्यांना त्यांच्या चुका समजतात, तेंव्हा त्यांची लाज वाटते, अपराधीपणाची जाणीव होते.

२. अकाली वृद्धत्व.

३. उद्याची भीती वाटते.

४. या त्रासातून बाहेर यायची काहींची भावना तयार होते. तर काही अती उदासीन होतात.

 

भावनिक परिपक्वता म्हणजे आपले दोष आणि पक्षपातीपणा ओळखण्याची आणि जेव्हा आपण चुकीचे असेल तेव्हा स्वीकारण्याची क्षमता होय.

आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करणं आणि त्या नियंत्रणाखाली ठेवणं जमायला हवं! मनापासून मानसिक तयारी कित्येकदा होत नाही आणि त्यामुळे प्रयत्न करूनही अशा व्यक्ती मुळ धारेत यायला उशीर करतात आणीं मग वेळ निघून गेलेली असते. गोळ्यावर जगायचे नसेल तर भूतकाळ विसरून लवकर आज जगल्यास जीवन किती सुंदर आहे हे समजेल.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *