समाज व मानसिक आरोग्य

आज काजल आणि उज्वला या दोघींचाही फोन होता व त्यांना त्यांच्या गावी मानसिक आजारासंबंधी जनजागृती करायचा विचार होता पण पद्धत माहीत नव्हती. ऐकून छान वाटलं की त्यांना त्यांच्या गावांमध्ये मानसिक आजारासंबंधी काहीतरी करायची इच्छा होती. मी त्यांना मदत करायची इच्छा व्यक्त केली कारण खेड्यापाड्यांमध्ये आज यासंबंधी जनजागृती होणे गरजेचे आहे. शहरांमध्ये बऱ्यापैकी याबाबत माहिती व उपचार उपलब्ध असतात. गाव पातळीवर एक तर बरेच समुपदेशक काम करण्यासाठी उत्सुक नसतात. हे जरी कारण असलं तरी गावामध्ये असणारी पंचमंडळी किंवा आप्तेष्ट आपापसातील मतभेद यापूर्वी मिटवायचे परंतु आता नवीन पिढीमध्ये ही गोष्ट संपुष्टात येत आहे. मग याबाबत माहिती देणे का गरजेचा आहे ते पाहू.

१. मुळात मानसिक आजार काय याबाबत माहिती नसणे.
२. असली तरी समुपदेशन उपलब्ध नसतात.
३. मानसिक आजार जाणून बुजून लपवली जातात कारण समाज काय म्हणेल याची भीती.
४. आत्महत्या किंवा घर सोडून जाणे अशा प्रकारच्या घटना घडणे.
५. आज 60 टक्के लोक खेड्यात राहतात. पण पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
६. भविष्याबाबत चिंता आणि भीती. आयुष्यात काही चांगले होईल याबाबत निराशा, हताश वृत्ती तयार होणे.
७. या आजारातून बरे होऊ शकतो याची माहिती नसणे.
८. जवळपास 80 टक्के जिल्हे भारतामध्ये विना सायकॉलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिक मदातिविना आहेत.
९. निसर्गावर विसंबून राहणारी ही मंडळी, होणाऱ्या नुकसानीला निसर्ग किंवा सरकारला दोषी ठरवते आणि आत्महत्या सारखे टोकाचे निर्णय घेते.
१०. आपसातील भांडणे टोकाला जाऊन मारामाऱ्या, जुगार, दारू यांच्या आहारी जाणे.
गाव, वस्ती पातळीवर मानसिक आजाराबाबत माहिती नसल्यामुळे कुठलाही उपाय न करता समाज त्याबरोबर राहताना दिसतो. शहरी व खेडोपाडी याठिकाणी साधारण हीच परिस्थिती दिसून येते. यासाठी उपाययोजना गाव व शहर पातळीवर केल्यास चांगला उपयोग होईल. बरेच एनजीओ आज कार्यरत आहेत व आपण जनजागृती केली तर अनेक फायदे होतील.
१. समाजातील सर्व थरांना मानसिक आजाराबाबत माहिती देऊन त्यांना हा आजार किती घातक परिणाम करतो हे सांगून उपचारासाठी तयार करणे.
२. ठराविक चाचण्या घेऊन आजाराची पातळी ध्यानात येते. त्यानुसार समुदेशन करणे सोपे.
३. आजही शासनाच्या अनेक योजना आहेत त्या अंतर्गत गावपातळीवर ह प्रोग्राम राबविला जाऊ शकतो.
४. शेतकऱ्यांना, मजुरांना होणाऱ्या यातना व त्यातून होणारी वैचारिक मुक्ती ही भजन कीर्तन या माध्यमातून होत असते. परंतु मानसिक आजार असणारी मंडळी यात सहभागी होत नाही व अलिप्त राहतात. अशा लोकांना शोधून मदत करता येते.
५. युवकांना याद्वारे रोजगार निर्मिती.
६. गाव पातळीवर असणारी आरोग्यविषयक जनजागृती समिती स्थापन होऊ शकते.
७. शहरी भाग सर्वच सुसंस्कृत असतो असे नाही, या भागात सुद्धा या आजारांमध्ये वाढ झालेली आहे म्हणून वेगवेळया कॉलनी, इमारती, शाळा, कॉलेज अशा ठिकाणी सुद्धा ह program राबवला तर मानसिक आजाराबाबत जागृती व समुपदेशन शक्य होईल.
हे काम संयुक्तिक आहे. तरीसुध्दा काजल व उज्वला यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. यासाठी आपण सर्वांनी पुढे येण्याची गरज असून कौटुंबिक व सामाजिक शांततेसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. यासाठी समाज प्रबोधन, माहिती संकलन व प्रेरणा देण्यासारखे हातभार लागले तर हे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात हा आशावाद निर्माण करुया. म्हणून या कार्यात सहभागी होण्यासाठी आम्हाला होईल तेवढी मदत वेळ देऊन करू शकत असाल तर आपण समाजाचे ऋण फेडू शकु.

@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *