समस्या आणि समुपदेशक
समस्या सोडविताना समुपदेशक कसा काम करतो हा प्रश्न एका शालेय विद्यार्थ्याने विचारला. त्याला विस्तृत माहिती देताना काही तथ्य सांगितली. अशा विद्यार्थ्यांसारखेच प्रश्न साधारण व्यक्तींना पडणं स्वाभाविक आहे. माझ्याकडे येणाऱ्या समस्याग्रस्त व्यक्तींचे मी सर्वसाधारण तीन गटांत वर्गीकरण करतो: १. पहिल्या गटातील व्यक्तींना आपल्याला काहीतरी समस्या आहे हे जाणवत असते, मात्र ती नेटकेपणाने त्यांना मांडता अथवा व्यक्त …