निरुपयोगी मी !

मी निरुपयोगी आहे असे मला नेहमी वाटते कारण बऱ्याचदा घरातील किंवा बाहेरील व्यक्ती मला तसे बोलून दाखवतात. त्यामुळे माझं मन फार विटून गेलेय. मी काय बोलतो, करतो तेही समजत नाही. थोडक्यात विनीत ला बऱ्यापैकी नैराश्य आलेले जाणवले. अशा प्रकारची केस हि एकाच महिन्यात पाचवी होती. याचा अर्थ असा कि हि संख्या कितीतरी पटीने अधिक आहे जिथे स्वतःला निरुपयोगी समजले जाते परंतु त्याबाबत वाच्यता केली जात नाही.

निरर्थक वाटण्यात बर्‍याचदा निराशा आणि क्षुल्लक भावना असते. अशा भावना बहुधा नैराश्याचे सामान्य लक्षण असतात, परंतु आत्म-सन्मान, दुर्लक्ष, गैरवर्तन, आघात किंवा कठीण परिस्थितींमुळे देखील त्या उद्भवू शकतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या विचारांना, भावनांना धोका पोहोचतो.
निरुपयोगी वाटणे, या विचारसरणीमुळे मोठा त्रास होऊ शकतो आणि दैनंदिन जीवनात सामान्यपणे कार्य करणे कठीण होते. जेव्हा आपण केलेले काहीही ठीक नाही किंवा आपल्या कोणत्याही प्रयत्नाने काही फरक पडत नाही असे वाटते, तेंव्हा आपण हताश होतो आणि उरलीसुरली प्रेरणा सुद्धा गायब होते. यामुळे, या भावनांचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग शोधणे आणि आवश्यक असल्यास मदत घेणे आवश्यक आहे.

निरर्थकपणाची भावना बर्‍याच वेगवेगळ्या घटकांमुळे होऊ शकते. संगोपन, सामाजिक अनुभव, स्पष्टीकरणात्मक शैली, तणावग्रस्त घटना आणि मानसिक आरोग्याची परिस्थिती या सर्व गोष्टी एक भूमिका बजावू शकतात. आपण अशा प्रकारच्या भावनांशी का झगडत आहात याची काही कारणे यात आहेतः

१. बालपणी झालेला आघात. आपल्याकडे लहानपणात नकारात्मक अनुभव असावेत ज्याने कायमस्वरूपी आपली मनावर छाप सोडली असेल. बालपणात दुर्लक्ष, गैरवर्तन आणि दुर्व्यवहार हे सर्व नकारात्मक भावनांच्या वाढीसाठी भूमिका निभावत असतात.
२. नकारात्मक घटनाना आपणच जबाबदार आहोत असे पाहणे. आपली स्वतः कडे पाहण्याची दृष्टी चुकीच्या पद्धतीने होते. .
३. मागील टीका. आपल्यावर झालेल्या भूतकाळातील टीका आपल्या मनावर राज्य करतात.
४. अडचणीत परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश.
५. मानसिक आरोग्याच्या स्थितीची चिन्हे. नैराश्यासारख्या मूड डिसऑर्डरमध्ये बहुतेकदा लाज, अपराधीपणा, हताशपणा आणि नाकर्तेपणाची लक्षणे दिसतात. अशा लक्षणांमुळे त्रास निर्माण होतो आणि नेहमीच्या दैनंदिन कार्यांचे व्यवस्थापन करणे कठीण होते.
६. कित्येकदा जाणूनबुजून अशा प्रकारच्या घटना हेतुपरस्पर केल्या जातात. ज्याणेंकरून सूड प्रवृत्तीच्या लोकांना वैयक्तिक गोल साध्य करणे सोपे होते.

आपणास निरुपयोगीपणाची भावना असल्यास, आपण लहान पण कृतीशील पावले उचलू शकता ज्यामुळे आपणास बरे वाटू लागेल. त्यासाठी ठराविक गोष्टी कराव्या लागतील.

१. स्वतःशी चांगले बोला. जरीही चुकले असे इतर म्हणत असतील तरीही स्वतःला दोष न देता चांगलाच विचार करणे गरजेचे.
२. चांगल्या घडलेल्या घटनांच्या नोंदणी करा. त्यात इतर नकारात्मक गोष्टी नकोत. एक डायरी ठेवल्यास चांगले.
३. दुसर्‍याच्यासाठी काहीतरी करावे. जेंव्हा आपण समाजसेवेत भाग घेतो, तेंव्हा आपल्या समस्या आपण विसरायला लागतो. इतरांच्या समस्या आपल्या पेक्षा जास्त आहेत.
४. मानसिक आजारासाठी तज्ज्ञांना भेट. गोळ्या न खाता ठराविक थेरपी मुळे आपण ठीक होऊ शकता. म्हणून जास्त वेळ न थांबता मानसोपचार तज्ज्ञांना भेटा.
५. चुका होण्यासाठी कारणीभूत घटक काय आहेत व त्यानां कसे हाताळायचे यावर नक्कीच विचार आणि सुधार करणे आवश्यक.
६. काही लोकांची सवय नेहमी हेटाळणी करायची असते म्हणून अशी माणसे ओळखा व त्यांच्या पासून आलेल्या विचारांना मनात ठार देऊ नका.
७. मित्रांशी बोला, व्यक्त व्हा पण ते मित्र मदतगार असावेत.
८. मेडिटेशन चे वर्ग प्रत्यक्षात अटेंड करा. शिका व प्रयत्न नक्कीच करा. फायदा होतोच.

हे लक्षात ठेवणे महत्वाचे की निरुपयोगी भावना देखील अंतर्भूत मानसिक आरोग्याच्या स्थितीचे लक्षण असू शकते. जर अशा भावना कायमस्वरुपी व त्रासदायक असतील किंवा दररोजच्या कामांना सामोरे जाण्यास अडचणी येत असतील तर आपल्या डॉक्टर किंवा मानसोपचार तज्ज्ञांशी बोला. ते आपल्याला नैराश्य किंवा चिंताग्रस्ततेच्या लक्षणांसाठी एखादी प्रश्नावली भरुन विचारू शकतात. नैराश्याच्या लक्षणांना कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना शोधण्यासाठी शारीरिक आणि रक्ताच्या चाचण्या देखील करायला सांगू शकतात.

एक ध्यानात ठेवा, प्रत्येकाला आयुष्यात एकदा का होईना आपण नालायक, बिनकामाचे असे वाटतेच परंतु तेच जर नेहमीचेच झाले तर मात्र सिरिअसली घ्या. सुदैवाने, या आजारावर नक्कीच उपचार आहेत.

श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ

2 thoughts on “निरुपयोगी मी !”

  1. Ashwini T. Jathar

    नकारात्मकतेवर नक्कीच मात करता येते … स्वतःच्या मनाची यासाठी तयारी असणे आवश्यक आहे … बरेचदा या स्टेपवरच अडचणी येतात आणि हे अवघड वाटते, तथापि ते अशक्य नाही..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *