विश्वासाची कमी

आत्मविश्वास कसा वाढवायचा यावर एक चर्चा सत्र घेतले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्यावर समाज प्रबोधन होणं हितावह आहे.

आत्मविश्वास म्हणजे तुमची कौशल्ये, गुण आणि यशस्वी होण्याच्या क्षमतेवर तुमचा विश्वास. स्वत:वर आत्मविश्वास असणे हे केवळ तुमच्या आरोग्यासाठीच महत्त्वाचे नाही तर इतरांद्वारे तुम्हाला कसे समजले जाते यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

दुर्दैवाने, प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेवर विश्वास वाटत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला काही विशिष्ट परिस्थितींमध्ये किंवा सेटिंग्जमध्ये अधिक असुरक्षित वाटू शकते. इतर प्रकरणांमध्ये, चिंता किंवा कमी आत्मसन्मानाची भावना तुमच्या खात्रीपूर्वक कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये व्यत्यय आणू शकते.

 तुम्हाला 100% वाटत नसतानाही, कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. कित्येकदा फक्त आत्मविश्वासाने वागण्याचा दिखावा करून सुद्धा आपल्यात आत्मविश्वास येऊ शकतो.

आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता याबाबत माहिती असूनही आपण या साध्या सोप्या गोष्टी करत नाहीत. काय कारणे असू शकतात?

१. अनुभवाची कमी.

२. माहितीचा अभाव किंवा चुकीची माहिती.

३. शिस्त नसणे. बेशिस्त वृत्ती. आळशीपणा.

४. दुसऱ्यावर अवलंबून राहणे किंवा तशी सवय.

५. स्वतःची अयोग्य वाढ.

६. लहानपणीच्या वाईट घटना किंवा दुःखी बालपण.

७. घरातील अयोग्य, कमी पोषक वातावरण.

८. इतरांशी तुलना करण्याची सवय.

९. चुकीचे गोल सेटिंग.

१०. पटकन नाराज होण्याची सवय.

११. चिंता, तणाव, नैराश्य ज्यांना व्यवस्थित हाताळता येत नाहीत, त्यांना आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी त्रास होतो.

१२. व्यसनाधीन व्यक्तिमत्त्व.

१३. नकारात्मक विचार आणि आजूबाजूचा परिसर.

आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी प्रयत्न लहानपणापासून व्हायला हवेत. शाळा कॉलेज मध्ये विविध कार्यक्रम याचसाठी घेतले जातात परंतु पालकांना मुलांच्या मार्कांच्या चिंता जास्त असते म्हणून अशा कार्यक्रमात ते सहभागी होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तरीही कुठल्याही वयात थोडे प्रयत्न केले तर नक्कीच आपण सुधारणा करून आत्मविश्वास परत आणू शकतो. मग काय करावं?

१. आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित करणे. जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत असता जिथे तुम्हाला आत्मविश्वास दर्शवण्याची गरज असते, तेव्हा तुम्हाला ज्या कौशल्यांवर आणि क्षमतांवर अधिक विश्वास वाटतो त्यावर लक्ष केंद्रित करणे उपयुक्त ठरू शकते.

२. स्वतःशी सकारात्मक संवाद. नेहमी स्वतः बाबत चांगला विचार करणं, बोलणं आणि कृती करणं हा एक सुदृढ पर्याय आहे.

३. यशासाठी उत्तेजन देणे अत्यंत गरजेचे. छोट्या छोट्या गोष्टीबाबत सतर्क राहून स्वतःला प्रोत्साहन दिले पाहिजे.

४. प्रेरणेला शोधणे. आत्मविश्वासी लोकांकडे पाहणे, प्रेरणादायी विधाने वाचणे हा देखील तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा एक मार्ग असू शकतो.

५. तुलना करणे टाळा. स्वतःची तुलना कुणाशीही नाही होऊ शकत आणि तसा प्रयत्नही करू नये.

६. नवीन आव्हाने स्वीकारा. नाविन्याचा ध्यास घेतल्यास मन आणि शरीर दोन्ही त्यादृष्टीने काम करू लागतात. आत्मविश्वास दुनावतो.

७. नित्य व्यायाम, योगा, मेडीटेशन आपल्या शारिरीक हालचाली योग्य ठेवतात. पोक काढून चालण्याची ढब बदलता येते. उभे राहणे, बसने, बोलणे, हातवारे करणं या सर्व गोष्टी तुमचा आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी मदत करतात.

८. आपण आहोत तसे स्वीकारणे. त्यात हवा तसा बदल करणे.

९. योग्य आहार घेणे. शिस्तबद्ध पद्धतीने जीवनचर्या चालू ठेवल्याने खूप फरक पडतो.

१०. वाचन, लेखन हे मुद्देसुद बोलण्यासाठी मदत करतात.

११. मदत घ्या. चांगला कोच आयुष्यात असलाच पाहिजे.

बाह्य आत्मविश्वास दिसण्यासाठी तुमच्या आंतरिक आत्मविश्वासाची पातळी वाढली पाहिजे. मन चंगा तो कठोती में गंगा अस म्हणतात ते उगीच नाही. यास थोडा वेळ आणि सराव लागू शकतो, परंतु शेवटी, आपण बाहेरून आत्मविश्वास कसा वाढवायचा हे शिकू शकता आणि आतून तो अधिक दृढपणे अनुभवू शकता. आत्मविश्वासाने टाकत चाललेले पाऊल हे तुम्हाला विकासाकडे नेणारे आहे. जरूर प्रयत्न करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *