औद्योगिक सुरक्षा आणि मानसशास्त्र

मागील आठवडा हा औद्योगिक सुरक्षा सप्ताह म्हणून भारतात पाळला गेला. याचे औचित्य साधून औद्योगिक क्षेत्रात मानसशास्त्राचा उपयोग कसा केला जातो आणि त्याचे फायदे काय, याचा उहापोह करण्याचा एका वेबिनार द्वारे प्रयत्न केला. आजही अनेक औद्योगिक विभागात याचा काडीचाही फायदा करून घेतला जात नाही. माहिती असूनही मानसशास्त्राचा वापर पैसे वाचविण्यासाठी, अनेकदा फालतू गोष्ट म्हणून पाहण्यात येते. परंतु प्रत्यक्षात गोष्ट वेगळी आहे. औद्योगिक मानसशास्त्र हा अंतर्गत भाग असून त्याचे फायदे प्रचंड आहेत.

मानसशास्त्रीय चाचणी केल्यास संस्थेला विविध प्रकारे फायदा होऊ शकतो, जसे कि;

१ संभाव्य स्टाफ मधून व्यक्ती विशेष माहिती करून घेऊन त्याच्या निवडीस मदत करणे;
२. संभाव्य कर्मचारी आहेत ज्यांच्यामध्ये विकास करून त्यांची मदत कंपनीला घेता येते.
३. कर्मचाऱ्यांचे मनोबल सुधारणे;त्यांच्या मानसिक शक्तीचा परिचय त्यांना करून देणं.
४. कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात मदत होते.
५. स्टाफ ला कायमस्वरूपी ठेवण्याची वृत्ती दर्शविणे.
६. खर्च कमी करणे आणि वेळ वाचविणे, योग्य कर्मचारी कंपनी साठी नेहमी पैसे वाचवत असतो.
७. चांगल्या कार्यप्रदर्शनासाठी अंतर्गत बेंचमार्क आणि मानके तयार करणे;
८. कर्मचारी आजच्या मितीला किती कार्यशील आहे याचे हेतुपूर्वक मूल्यांकन करणे;
९. कंपनी मध्ये सर्व एक सारखे आहेत याची पारदर्शिता तयार होणे.
१०. वैध आणि विश्वासार्ह टेस्ट्सच्या माध्यमातून वेळोवेळी लोकांचे मूल्यांकन करण्याचा मार्ग हा यशाकडे घेऊन जातो.

कुठल्या कारणासाठी या चाचण्या कराव्यात?

१. प्रोमोशन
२. औपचारिक मूल्यमापन.
३. निवड
४. कामावरून कमी करताना.

या कर्मचाऱ्यांची कशी पारख केली जाते?

१. ज्ञान – कुठले ज्ञान या व्यक्तीकडे आहे, या ज्ञानाचा फायदा कंपनीला कसा होऊ शकेल.
२. कामाचे कौशल्ये – प्रत्येकाचे काम करण्याचे कौशल्य वेगवेगळे असते. याची ओळख करून घेणं क्रमप्राप्त आहे.
३. सामाजिक कौशल्ये – चांगला संवाद साधणारा, इतरांशी चांगला वागतो का, मन वळविणारे, कार्यसंघ, नेतृत्व नियंत्रित करण्यास किंवा त्यांच्यावर प्रभाव पाडण्यास सक्षम आहेत. यांना आपण सामाजिक बुद्धिमत्ता किंवा भावनिक बुद्धिमत्ता देखील म्हणतो.
४. संस्थेसाठी उपयुक्तता. व्यक्तीच्या उपयुक्तता माहिती असणे गरजेचे आहे तरच संस्था पुढे जाते.
५. काम करण्यासाठी आवश्यक वर्तन. सकारात्मक वागणूक असेल तर इतर लोकांबरोबर एक टीमवर्क म्हणून जमू शकते.
६. शारीरिक गुणधर्म – प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी आहे. कुठल्या प्रकारचे काम त्या व्यक्तीला द्यावे यासाठी.
७. मानसिक क्षमता – उदाहरणार्थ समस्या सोडवणे, व्यावहारिक निर्णय, कारकुनी क्षमता, यांत्रिक आकलन इ. गोष्टी जमू शकतात का.
८. व्यक्तिमत्व – अंतर्मुख कि बहिर्मुखी, स्वभाव असे काही ठराविक व्यक्तिमत्व लोकांचे असतात. त्यानुसार त्यांना कामे जमतात.
९. आवडी आणि मूल्ये. त्यांना कुठल्या आवडी आहेत आणि त्यांची जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे पाहणे.

आजही भारतामध्ये अनेक युवक आणि युवती पीजी करून जॉबलेस आहेत. नोकऱ्या नाहीत म्हणून काही मंडळी घरी बसते हे कारण जरी मान्य केले तरी योग्य उमेदवाराला आजही मागणी नक्कीच आहे. ज्यांना जॉब मिळत नाहीत, त्यांनी आपले स्वतःचे अवलोकन करून घेणे आवश्यक आहे. जर हे शाळा – कॉलेजपासून सुरु झाले तर नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल. याच अनुषंगाने, भारत सरकारच्या अनेक योजना स्किल डेव्हलप करण्यासाठी सुरु असून सुद्धा अनेक कॉलेजेस चे विद्यार्थी सक्रियतेने भाग घेत नाहीत. काय करणे आहेत?

१. सुविधांचा अभाव.
२. योग्य माहितीचा अभाव.
३. चुकीची मानसिकत।
४. खराब कुटुंब व्यवस्था.
५. अयोग्य समुपदेशक
६. निर्णय क्षमतेची कमी.
७. शासनावर अविश्वास.
८. आरक्षण आणि अनिशचितता.
९. धरसोड वृत्ती.
१०. काही करायची इच्छा नसणे.

कुठल्याही पद्धतीने कंपनीमध्ये जरी चिकटले तरी सुद्धा काही जण काम फक्त टाइमपास साठी करायचा प्रयत्न करताना आढळतात. अर्थात त्याला अपवाद भरपूर जण मिळतील. परंतु जगभरात पैसा हाच महत्वाचा वाटतो आणि मानसिक शांती दुय्यम. मग नंतर सुरु होतात कलह. आद्योगिक कामगार त्याचे मन आणि डोके शांत घेऊन गेट च्या आत शिरला तरच त्याच्या कामाचा दर्जा हा उच्च असतो अन्यथा नाही. यासाठी मानसशास्त्रीय चाचण्या औद्योगिक वसाहती साठी अत्यंत उपयुक्त ठरतात. ज्याने करून अर्थ आणि कुटुंब व्यवस्था योग्य रीतीने चालू राहील.

श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ञ्

2 thoughts on “औद्योगिक सुरक्षा आणि मानसशास्त्र”

  1. लेख उपयुक्त आणि खुप महत्वाचा आहे आणि विशेष बाब म्हणजे औद्योगिक मानसशास्त्राविषयी मराठित माहिती उपलब्ध करून दिली या बद्दल विषेश आभार. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील अमानसशास्रीय व्यक्ती हि विषय समजून घेईल अशी सरळ भाषा

    धन्यवाद आणि शुभेच्छा

    जमीर आर. एस. ( आय.एफ.एस.ओ. )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *