मनाचे पैलू

मन ताब्यात असणं म्हणजे काय असा प्रश्न काहीजण वेगवेगळ्या कोनातून विचारतात. मनावर राज्य नेमकं कुणाचं हाही एक काहींच्या डोक्यात येणारा विचार. 

बाह्यमन जहाजाच्या कप्तानासारखं असतं. कप्तान जहाजाला दिशा देतो. इंजिनरूममधील कर्मचाऱ्यांनाही तोच आदेश देतो. त्याच्या आदेशानुसार हे कर्मचारी बॉयलर, इंजिन सारखी विविध यंत्रं हाताळत असतात. त्यांना हे माहीत नसतं की, ते कोठे जात आहेत. ते केवळ कप्तानाच्या आदेशांचं इमाने-इतबारे पालन करत असतात. जहाजाच्या अग्रभागी उभ्या असलेल्या या माणसानं त्याच्याकडील कंपास, होकायंत्र वापरून जरी चुकीचे आदेश दिले तरी इंजिनरूमचे लोक त्याच आदेशाचं पालन करतात. कारण तोच त्यांचा बॉस आहे, तो काय करत आहे हे त्याला माहीत असायला हवं. त्यामुळे इतर सदस्य त्याच्याशी वाद घालत नाहीत, ते फक्त त्याच्या आदेशाचं पालन करतात.
जसा जहाजाचा कप्तान जहाजाचा मालक असतो आणि इतर त्याचे आदेश मानतात; तसंच तुमचं बाह्यमन तुमच्या आयुष्यरूपी जहाजाचा कप्तान व मालक आहे. तुमचं अंतर्मनच तुमच्या शरीराचा, तुमच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचा आणि आयुष्याचा कप्तान आहे. तुमचं बाह्यमन कशावर विश्वास ठेवतं, ते काय स्वीकारतं, यावर आधारित असलेल्या तुमच्या सूचनांचं पालन तुमचं अंतर्मन मुकाट्यानं करत असतं. अंतर्मन कधीच उलटतपासणी किंवा प्रतिप्रश्न करत नाही; तसंच ते आदेश कशावर आधारित आहेत याच्याशी त्याला काही देणं-घेणं किंवा कर्तव्य नसतं. केवळ तुमच्या आदेशांचं पालन करणं एवढंच अंतर्मनाला समजतं.
आपल्याला कधी कळतच नाही की, आपण आपल्या नकारात्मक विचारांमुळे तशीच परिस्थिती निर्माण करतो.
ठराविक गोष्टी लक्षात ठेवण्यायोग्य आहेत ज्या अनेक विचारवंत, संतांनी सांगून ठेवल्या आहेत.

१. आपल्या इच्छापूर्तीसाठी आत दडलेल्या सुप्त गुणांचा शोध घेतल्यास ते आपल्या अंतरंगातच आहेत याची जाणीव होईल.
२. आजपर्यंत होऊन गेलेल्या महान व्यक्तींच्या यशामागचं रहस्य म्हणजेच त्यांनी त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीशी साधलेला संवाद व त्या योगे ती शक्ती कार्यान्वित करण्याची त्यांना उमगलेली कला. आपणही त्याचं अनुकरण करू शकतो.
३. आपल्या प्रत्येक समस्येवरचं योग्य समाधान अंतर्मनाकडे आहे. तुम्ही जर तुमच्या मनाला सांगितलं, ‘मला पहाटे ५ वाजता उठायचं आहे,’ तर ते तुम्हांला नेमकं त्या वेळी जागं करेल.
४. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं अंतर्मन. ते आपलं व्यक्तिमत्त्व योग्य प्रकारे घडवू शकतं.
५. आपण केलेला प्रत्येक विचार ही एक प्रकारची क्रिया आहे आणि आपली परिस्थिती ही त्या विचारांची प्रतिक्रिया.
६. तुमच्या विचारांना नियंत्रित करण्याची क्रिया हे अंतर्मनच करत असतं व त्यानुसार ते तुम्हांला प्रतिक्रिया देत.
७. ‘हे झेपणार नाही’ किंवा ‘हे करणं अशक्य आहे’ असे उद्गार कधीही काढू नका, तुमचं अंतर्मन तुमचा प्रत्येक शब्द खरा करत असतं.
८. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजेच विश्वास. कुणावरही किंवा कुठल्याही गोष्टीवर सहजासहजी विश्वास ठेवू नये. अनेकदा चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकेल.
९. विचार बदला म्हणजे नशीब आपोआप बदलेल.

मनाची सायकलशी तुलना केली जाऊ शकते, जर आपण सायकलला पॅडल केले तर सायकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल, तेच मनालासुध्दा लागू होते ते सतत वाहणाऱ्या विचारांमुळे भटकत राहील.ते सध्याच्या क्षणी विशिष्ट विचारांनुसार कार्य करेल, कल्पना करेल,अनुभुती आणि कर्म करेल.

जेव्हा आपण कोणतीही कृती करत नाही तेव्हा विचार रिक्त व उथळ होतात आणि कालांतराने लोप पावतात.

नकारात्मक आणि अनावश्यक विचारांना महत्त्व न देण्याच्या पद्धतशीर दृष्टिकोनामुळे काही काळानंतर विचार नाहीसा होतो किंवा पोकळ होतो.

चांगले विचार जोपसल्यामुळे आणि त्यांवर लक्ष केंद्रित करून आपण सुख आणि समृद्धीने भरलेल्या योग्य मार्गावर प्रगती करू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *