निरुपयोगी कौशल्य

 

गेले २५ वर्ष जगभर काम करताना माझ्यासारख्या अनेकांना, स्वतःमध्ये अजून काही कौशल्य असते तर कदाचित अजून पुढे जाता आले असते असे नेहमी वाटते. जरी हे कौशल्य बिनकामी असती तरी ते कामाला आणता आले असते. पेपर ला बातम्या येतात की मराठी माणसात कौशल्याची कमी आहे. आपण मान्य केले पाहिजे की आपल्यात कुठल्या कौशल्याची कमी आहे हे दाखवणारी सिस्टीम आपण तयारच केलेली नाही. जरी कौशल्य आले तरी त्याचा वापर कसा व कुठे केला पाहिजे याबाबत मार्गदर्शनाची कमी पडते. अभ्यासक्रमाशी निगडित कौशल्य कित्येकदा शिकवले जातात पण बिनकामाचे किंवा इतर कसे शिकणार, काय गरज आहे वगैरे या गोष्टींचा विचार करायला हवा.

जर तुमच्यात “कुशल” कौशल्य असतील तर काय होईल, सगळ्यात पहिले पाहू या कौशल्याचे फायदे;

१. फक्त कौशल्याच्या आधारे तुम्ही जग जिंकू शकता. खूप उदाहरणे आहेत.
२. नोकरी मध्ये प्रोमोशन करिता, टिकून राहण्यासाठी, दुसरी नोकरी मिळवण्यासाठी.
३. दिलेले काम पटकन आणि व्यवस्थित करण्यासाठी.
४. व्यावसायिक बनू शकाल.
५. पगाराव्यतिरिक्त पगार कमावण्यासाठी.
६. इतरांना इंप्रेस करण्यासाठी, त्यातून अनेकांचा फायदा झालेला आहे.
७. आयुष्यात कधीपण वेळ आली की स्वतःच्या पायावर उभे राहायला हेच कौशल्य कमी येतात.
८. कुणीही तुमचा अपमान करत नाही.
९. जिथे जाल तिथे कौशल्यामुळे तुमचा उचित आदर केला जाईल.
१०. संसारात कुठे कमी पडणार नाहीत. समाजात / घरात कसे वागायचे, बोलायचे, करायचे ते जमेल.

असे असंख्य फायदे दिसून येतात मग एवढे असून सुद्धा आपण कौशल्य का शिकत नाहीत ? कॉलेजमध्ये शिकवताना किंवा समुपदेशन करताना, विद्यार्थ्याने का शिकायचे ते पहिले ठरवले तर कौशल्ये कुठली लागतील ते लक्षात येतील. मग ते कसे शिकायचे तो प्रश्न सोपा. कुठलेही निरुपयोगी कौशल्य (फालतू) असले तरी फायदे खूप आहेत जसे की,

१. त्यामुळे इतर कौशल्ये विकसित करण्यात मदत होते. कदाचित तुम्ही त्यामध्ये सुंदर करिअर बनवू शकता.
२. स्वतःचे मनोरंजन करण्यास मदत होते.
३. सगळ्यांमध्ये उठून दिसणे – तुमचे गुणधर्म वेगळे दिसून येतात आणि तुम्ही पटकन ध्यानात राहता.
४. आयुष्याला अधिक श्रीमंत बनवतात आणि अनुभवात भर घालत असतात.
५. तुमचे अपयश यामुळे इतरांच्या ध्यानात येत नाही.

मग कौशल्य शिकण्यासाठी माझ्यात “काय हवं?”
१. सकारात्मक मानसिकता.
२. कुठेही, कुठलेपण, काहीपण मनापासून करायची तयारी.
३. प्रसंगी अपमान सहन करण्याची मनाची तयारी… चांगला शागीर्द बनण्यासाठी वस्तादचे फटके पण खायला हवेत.
४. खटपटा स्वभाव.
५. नेव्हर गिव्ह अप अटीट्युड – शिकवून – करून दाखवीन ही वृत्ती व जिद्द.
६. हे शिकून फायदा काय तो विचार नंतर पण उपयोग कुठे करावा याची माहिती व समयसूचकता.

असे खूप काही जन्मजात गुण आपल्यात असतात पण ते माहित नसल्याने दिसत नाहीत, तर कधी दिसून वापरात येत नाहीत, आलेच तर पालक किंवा इतर त्याचा मजाक उडवतात किंवा ध्यान देत नाहीत. जरा इकडे तिकडे बघा व ठरवा मला काय हवय, मग सुरु करा कौशल्य ग्रहण. भारत व महाराष्ट्र सरकार द्वारे अनेक ठिकाणी, मोफत कौशल्य विकास योजना राबवल्या आहेत, माहिती घ्या, “स्वयं” किंवा “मूक” पोर्टल online सुविधा पुरवते व सोशिअल मीडिया पासून ब्रेक घेऊन हे कराच, कारण तेच कामाला येणार अन्यथा तुम्ही कामातून जाणार, हे स्पर्धात्मक युग आहे.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *