स्मार्टफोन आणि मनस्ताप

काल जयश्रीचा प्रश्न होता की या फोन पासून मला मुक्ती कशी मिळेल. हसू येतं ना? फोन असून आणि नसून खोळंबा अशी स्थिती जगभर आहे असे सांगितल्यावर तिला कदाचित बरे असावे की मला जोडीदार भरपूर आहेत. गोष्टीचा अतिरेक नको हे जयश्रीला समजले यात तिची जीत समजतो. स्मार्टफोनच्या व्यसनाची काही प्रमुख चिन्हे आणि लक्षणे दिसतात.

१. सहनशीलता – कमी झाल्याची भावना.
२. अलिप्तता – एकटे रहाण्याची सवय जडणे.
३. स्मार्टफोन वापरात कपात करण्याचा प्रयत्न अयशस्वी.
४. मोबाइल फोन वापरताना वेळेचा दुरुपयोग व त्याची जाण.
५. आपल्या इतर भावना लपवण्यासाठी वापर.
६. शारीरिक ताण – डोळे, मान, स्नायू व डोके दुखी.
७. मानसिक ताण.

स्मार्टफोन व्यसन लहान मुलांना अत्यंत पटकन लागते व ते अत्यंत असुरक्षित आहे. मानवी मेंदू सुमारे 25 वर्षे वयापर्यंत पूर्णपणे विकसित होत नाही. किशोरवयीन मुलांसाठी जे स्मार्टफोनवर अवलंबून असतात त्यांच्या मेंदूच्या विकासामध्ये नकारात्मक बदल घडतात.

१. मेंदूची कनेक्टिव्हिटी कमी होते.
२. निर्णय घेणे, आवेग-नियंत्रण आणि भावनिक नियमनासाठी जबाबदार असलेल्या मेंदूतल्या काही समस्या तयार होणे.
३. स्मार्टफोनमध्ये व्यसन असलेल्या लहान किंवा किशोरवयीन मुलांमध्ये कमी आहार घेण्याची शक्यता, कमी झोप, अबोल व्यक्तिमत्त्व, अभ्यासात दुर्लक्ष.
४. जास्तीत जास्त सेल फोन वापरल्यामुळे या किशोरांना सामाजिक दुरावा येऊ शकतो.

फक्त लहान मुलेच नाही तर तरुण गट जास्त अॅक्टिव दिसतो. जयश्री ने एक महिना फोन बंद करून सुध्दा तिच्या मानसिकतेतून ती पडलेली नव्हती. एखाद्याला सेल फोनच्या व्यसनात किंवा नॉमोफोबियाचा त्रास होऊ शकतो, मोबाईल फोन नसल्याची भीती आपल्यात बदल घडवते:

१. फोनची बॅटरी कमी असते तेव्हा काळजी वाटते.
२. सेल फोन चुकीच्या ठिकाणी किंवा सेवा उपलब्ध नसल्यास घाबरणे.
३. वास्तविक जीवनात लोकांशी संपर्क साधण्यापेक्षा ऑनलाइन कनेक्ट होण्यात अधिक वेळ घालवते.
४. उशीवर किंवा त्याखाली स्मार्टफोनसह झोपणे.
५. ड्रायव्हिंगसारख्या धोकादायक परिस्थितीत फोनचा वापर करतो.
६. जेवणाच्या वेळी त्याचा किंवा तिचा फोन हातात असतो.
७. फोन आला किंवा व्हायब्रेट झाला असा भास होतो.
असे असंख्य लक्षणं आपण रोज पाहिल्यावर हताश होतो आणि अशा व्यक्तींना या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु या मध्ये जयश्री सारखी मनापासून इच्छा हवी. काय करणे अपेक्षित आहे?

१. स्वतःचे उपचार –
a. स्वतःला व्यस्त ठेऊन, फोन कधी व कसा वापरायचा याचे नियोजन. सेल्फ कंट्रोल असेल तर शक्य होते.
b. फोन ऐवजी बुध्दीचा वापर करून गणितं किंवा ग्रामर, स्पेलिंग दुरुस्त केल्यास फोनवर अवलंबन दूर होईल. फोन नंबर ध्यानात ठेवण्यासाठी युक्ती वापर आपल्या मेमेरीला शाबूत ठेवेल.
c. काही अॅप आहेत जे ऑटोमॅटिक आपला फोन ठराविक वेळेनंतर कुठलाही वापर बंद करतो.
d. मेंदूला शांतता मिळण्यासाठी, मेडीटेशन, mindfulness, अशा अनेक गोष्टी आहेत.
e. झोपायच्या आधी 2 तास फोन आपल्या बेड पासून दूर ठेवल्यास छान.
f. व्यसन हे हळू हळू दूर होईल, एक दिवसात नाही म्हणून वेळ द्या.
२. मानसोपचरतज्ज्ञ काही थेरपीचा वापर करून व्यसनापासून मुक्ती देतात.
३. स्मार्टफोन व्यसनमुक्तीसाठी त्या व्यक्तीबरोबर इतरांची साथ हवी. सर्वांनी सहकार्य केल्यास कायमस्वरूपी उपाय होतो.
४. प्रत्येकाची सवय मोडण्याची पद्धत वेगळी असते हे ध्यानात घेऊन जी पद्धत लागू होते तिचा वापर करून घेतल्यास चांगले.
५. स्मार्टफोन योग्य पद्धतीने हाताळण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्याला दूर न करता त्याचा उपयोग मला परिपूर्ण माहिती साठी कसा वापरता येईल असा विश्वास ठेवणे.

स्मार्टफोन रूपाने बसलेले हे माकड आपल्या खांद्यावरून जितक्या लवकर उतरेल तितके चांगले. सुरुवातीला ते खाजवेल आणि छान वाटेल परंतु तेच नंतर जखम बनवते. आपल्या सभोवताली, घरी, ऑफिसात, अशी अनेक माणसे कामाव्यतिरक्त फोन वापरताना दिसतात त्यांना जरूर आठवण करून द्या. गरज असेल तर नक्की समुपदेशन घ्या व या स्मार्टफोनरुपी माकडाला खाली उतरवा..नाहीतर…

 

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *