झोप आणि मानसिक संतुलन

 

काही जण मस्त झोप काढतात आणि काही झोप येत नाही म्हणून तक्रार करतात. हा निद्रानाश प्रकार जगातील सामान्य समस्या असून ३३% लोक पीडित आहेत. याबाबत ढोबळ मनाने आपण करणे शोधू शकतो. आपण प्रयत्न करूनसुद्धा पुरेशी झोप न येणे हे थोडे मनाला पटत नाही. यामुळे झोपेच्या अभावाचा, मानसिक आरोग्यासह आणि इतर आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. झोप आणि मेंदू यांची मैत्री अतूट आहे. सुरुवातीला काही गोष्टी आपण सहन करतो परंतु नंतर ते सहनशक्तीच्या पलीकडे गेले की प्रॉब्लेम दिसायला लागतात.

१. ताण – राग, मन न लागणे, निराशा, चिडचिडेपणा वाढत जातात.
२. औदासिन्य (डिप्रेशन) – मन दुखी होणं, रागाची भावना, मन कशात रमायला नाकारते.
३. चिंता – झोप आणि चिंता यांच्यातील संबंध दोन्ही दिशांनी जाणवते. झोप नाही म्हणून चिंता वाढते, तर चिंता आहे म्हणून झोप नाही.
४. मूड स्विंग / असमतोल होणे – व्यक्तिमत्व संपुर्ण बदलणे,गोंधळ होणे.
५. हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर – जवळपास २५ ते ५५% मुलांमध्ये झोपेचा प्रॉब्लेम ADHD शी निगडित आहे.

मानसिक आजारामध्ये झोप महत्वाची भूमिका निभावते. चांगली व प्रमाणात झोप वरील गोष्टी बऱ्यापैकी कमी करू शकतात. भरपूर झोपेपेक्षा क्वालिटी महत्वाची असते. मग या झोपेचा प्रश्न कसा दूर करायचा:

१. जीवनशैली बदलणे – अमर्यादित दुपारची झोप,अनियमित खाणे, वेळीअवेळी फक्त लोळत राहणे – टाळणे.
२. झोपेला अडथळा आणणाऱ्या गोष्टी (जसे की कॅफिन, निकोटीन, मोबाईल आणि अल्कोहोल) टाळणे. शक्यतो बेडरूम मधून TV पहिला बाहेर काढा. रेडिओ ला टाइमर लावून झोपले तर मध्ये झोप उडणार नाही. मोबाईल चा स्मार्ट वापर.
३. झोपेपूर्वीची स्वच्छता – झोपतो ती जागा, वातावरण, स्वतःची – स्वच्छता.
४. शारीरिक काम – व्यायाम, स्वतःचे कामे स्वतः करणे.
५. मेडिटेशन, संगीत, कुटुंबासमवेत वेळ घालवणे, हलके फुलके विनोद वातावरण शांत करत असतात.
६. मानसिक आरोग्याकरिता प्रथम तज्ज्ञाकडून पातळी चेक करून पुढील उपचार लवकर सुरु करा.

झोपेचे वेळापत्रक कायम हवे, शक्यतो त्यात तडजोड नको. दुपारची डुलकी साधारण १५-२० मिनिटांपेक्षा जास्त नसावी. झोप साधारण ५ टप्प्यामध्ये होते त्याला स्लीप सायकल म्हणूया, ती जवळपास ९० मिनिटांची असते. रात्री झोपेतून १ किंवा २ वेळा उठून पुन्हा चांगली झोप येत असेल तर प्रॉब्लेम नाही. पण २ पेक्षा जास्त उठून पुन्हा झोप नीट येत नसेल तर मात्र प्रश्न येतात. ७ ते ९ तास झोप आवश्यक असते. जर कमी झोप घेतली तर कार्य करण्याची शरीराची क्षमता घटते. झोपेच्या पहिल्या सत्रामध्ये (11 pm ते ३ am ) सगळ्यात चांगली झोप होते.

मानसिक आरोग्य नीट राहिले तर साधे ताण तणाव, चिंता, नैराश्य, औदासिन्यता जास्त वेळ टिकत नाही. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीबद्दल गृहित आणि अपेक्षित धरायची प्रवृत्ती असते, तिला एकदा मूठमाती दिली तर जीवन सुंदर जगता येते. जर झोपेचे प्रश्न प्राथमिक असेल तर त्वरित त्याला सोडवा. झोपेची गोळी पर्याय नाही त्याऐवजी, मस्त पैकी दणकून खा – कचकून काम करा असा संदेश वरिष्ठ मंडळी करताना दिसतात ते उगीच नव्हे.

‘लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे’ …मग करा सुरुवात मानसिक संतुलन जागेवर आणायची.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *