आत्मसन्मान

 

दिवसभर अंग मेहनतीचे काम करून पण कुणी रिस्पेक्ट देत नाही यार म्हणून मित्राने सांगितले. त्यासंदर्भात मानसिक समाधान कसे मिळवायचे, स्वतःची किंमत कशी वाढवायची यासाठी मित्राबरोबर काही चर्चा करून त्याला शांत केले. घरी किंवा कामाच्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्या की आत्मविश्वास डळमळीत होतो.असं का होतं की सहकारी किंवा वरिष्ठ अधिकारी आपला आदर करत नाही. आत्मसन्मानाचा अभाव अनेक लोकांमध्ये त्यांच्या नकारात्मक वातावरणामुळे बिंबलेला असतो. कुठेही काम करताना, वागणुकीमुळे कदाचित काही गोष्टी आपल्याकडून झाल्या असतील त्यामुळे आपला अनादर केला जातो, जसे की;

१. इतरांना तुमच्या साठी खोटं बोलायला लावणे.
२. आपल्या चुकांसाठी दुसऱ्याला दोष देणे. आपल्या चुका लपवणे.
३. कामाच्या वेळेत गप्पा. इच्छा नसणे, निष्काळजी वृत्ती.
४. वरिष्ठानी प्रश्न किंवा माहिती विचारल्यास जाणून बुजून विचारलं असं गृहीत धरून उद्धट उत्तर देणे.
५. आश्वासन पूर्ण न करणे. खोटं बोलणे. माझेच खरे असे अटीट्युड.
६. कामावर वारंवार उशिरा येणे. आळशी स्वभाव.
७. इतरांचा अनादर करणे.

आत्मसन्मान मिळवायला काही गोष्टी पाहायला हव्यात.
१. काम करताना आत्मविश्वास दाखवणे. अजून कसे चांगले करता येईल हे बोला.
२. दिलेले काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. सातत्य ठेवा. गप्पा नकोत.
३ काम करताना नम्रता दर्शवा. राग नकोच. इतरांचे मनःपूर्वक ऐका.
४. इतरांशी संयम ठेऊन बोला – नकार दिलेल्या व्यक्तीच्या मागे पळत बसू नका. सगळ्यात शक्तिशाली प्रेरणा नकारातून मिळत असते.
५. कदाचित तुमच्या बरोबर काम करणारी व्यक्ती नावडती असेल तरी त्यांचा आदर करणे.
६. सकारात्मक देहबोली – वागणे, चालणे, बोलणे, हसत चेहरा, मदत करण्यात तत्परता.
७. टीम प्लेयर व्हा – सर्वाना विश्वासात घेऊन एकत्रित काम किंवा मदत करणे.
८. सहकामगारांची स्तुती केल्याने त्यांनाही आनंद वाटतो.

सर्वप्रथम स्वतःचा आदर करायला शिका. तुम्ही जर स्वतःचा आदर करत असाल,तर आणि तरच समाजही तुमचा आदर करेल. आदर द्या आणि आदर कमवा, आपली मुलं तेच अनुकरण करतील. आजच्या खेचाखेचीच्या जीवनामध्ये मानसिक आनंद फक्त चेहऱ्यावरचे निखळ हसू देते. तर बघू आजपासून आपल्या सभोवताली किती लोकांना आपण आनंद देतोय आणि आत्मसन्मान वाढवण्याचा प्रयत्न करतोय.

आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणच नाही, शिकलात तरच हक्काची भाकरी.

@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *