आत्म-नियंत्रण आणि मी

माझे स्वतःवर नियंत्रण नाही म्हणून काय करावं हा प्रश्न सविताला पडलेला. पण तिला कन्फ्युज न होता विचारले की म्हणजे नेमके काय? स्वत: ची नियंत्रणे ही आवश्यक असतात व त्यात नियमितपणे बदल करण्याची क्षमता आपल्यात असते. संशोधनात सांगते की आत्म-नियंत्रण ठेवणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. मानसशास्त्र दृष्टीने सामान्यत: आत्म-नियंत्रण म्हणजे,

१. मोह टाळण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी वर्तनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता
२. कुठल्याही गोष्टीला लगेच प्रतिउत्तर देण्या अगोदर नियंत्रण. प्रतिकार क्षमता.
३. जे कार्य करायचे त्यावर नियंत्रण आणि सहजरीत्या त्याला ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न.

सविताचा हाच एक प्रॉब्लेम होता. आत्म नियंत्रण रोजच्या जीवनात का गरजेचे आहे हे आपल्या सर्वांना माहिती असून सुध्दा ते होत नाही. म्हणजे नेमकं काय,

१. ठरवून उठायचा टाईम माहीत असून सुद्धा ना उठणे.
२. ठरवलेली कामे जी पूर्वी नियमित व्हायची ती आता न होणे.
३. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण असून सुद्धा त्या गोष्टी न होणे.
४. मिळकतीचे उद्दिष्ट्य साध्य न होता त्यात समाधान न वाटणे.
५. अभ्यास वेळापत्रक कोलमडले की त्रास.

अशा असंख्य प्रश्नांनी आपले मन दुःखी होते, वाईट वाटते. मग नेमके काय प्रॉब्लेम आहेत ज्याने करून आत्मनियंत्रण होत नाही. उदा.

१. आत्मविश्वासाचा अभाव.
२. अती महत्वाकांक्षा.
३. जेनेटिक issue.
४. प्रमाणापेक्षा अधिक खर्च व उधारी.
५. ड्रग व अमली पदार्थांचे सेवन.
६. जेवण वेळेवर नसणे किंबहुना अयोग्य आहार.
७. तीव्र चिंता. मानसिक तणाव.
८. व्यायामाची कमी किंवा न करणे.
९. अयोग्य मैत्री व वातावरण.
१०. अती राग, विनाकारण जळफळाट होणे.

आयुष्यात जेंव्हा आत्म् नियंत्रण नसते तेंव्हा सगळ्यात अगोदर त्याचे फायदे व तोटे जाणून घेतले तर मन भक्कम व्हायला वेळ लागत नाही. काय करावे ज्याने करून आत्न नियंत्रण व्यवस्थित होईल.

१. योग्य आहार व पुरेशी झोप.
२. नित्य व्यायाम आणि सकारात्मक विचारसरणी.
३. अपेक्षा ऐवजी सशक्त नियोजन. आवाक्यातील टार्गेट ठेऊन पुन्हा प्रयत्न केल्यास अपेक्षाभंग होत नाही.
४. एखादी गोष्ट मनाप्रमाणे नाही झाली तर प्रॉब्लेम चे मूळ शोधायला हवे परंतु त्यात बदल होऊ शकतो का हा विचार ठेवल्यास वाईट वाटत नाही. कुणीही परफेक्ट होण्याआधी सहस्र चुका करतोच.
५. स्वतःला दोष न देणे. हुरूप हाच आपला आत्मविशवास. निराशेच्या खाईत न जाणे चांगले.
६. मनाला नियंत्रित कारणे म्हणजे मेंदू व मन यांना संतुलित ठेवणे आलेच. मेडीटेशन आणि योग्य सल्ला, समुपदेशन मदत नक्कीच करतं
७. थकवा आला असेल तर शक्यतो निर्णय घेणे थोडे टाळले तर नंतर पस्तावा येणार नाही.
८. अहंकार नेहमीच स्वतः ची फसवणूक करत असतो. त्यापासून चार हात दूर बरे.
९. चांगले मित्र, वातावरण व त्याची निर्मिती ही आपल्या विचारांवर अवलंबून असते. सकारात्मकता ही गुरुकिल्ली हे आपले गुरू नेहमी सांगतात.

आत्म नियंत्रणाचे फायदे खूप आहेत.

१. वजन नियंत्रण व शारीरिक, मानसिक आरोग्य.
२. योग्य निर्णय प्रक्रिया.
३. विचारांची सुसत्रता.
४. आनंदी वातावरण निर्मिती.
५. परिवार आणि समाज यात एकोपा.
६. मनशांती मनी वसते. शोधायला हिमालयात जाण्याची गरज नाही.
७. इतरांना दुखावले जात नाही. इच्छा नियंत्रणात राहतात.

असंख्य प्रश्नांना आपण आरामात संतुलित करू शकतो जेंव्हा आत्त्म नियंत्रण आपल्या हातात असते. ते अनियंत्रित होऊ नये म्हणून प्रयत्न सुद्धा आपल्या हातात व मनात असतात याची जाणीव लहानपणीच आपल्या मुलांना करून दिल्यास पुढे जाऊन नवीन पिढीला प्रेरणादायी बनवू शकु. अन्यथा मनस्ताप आणि मानसिक आरोग्य हानी होण्याचा धोका नक्कीच आहे.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *