स्वत: ची काळजी घेतली म्हणजे सकारात्मक भावना निर्माण होऊन तुमचा आत्मविश्वास वाढतो. तसेच, स्वत: ची काळजी स्वत: ला आणि इतरांनाही आठवण करून देते की आपल्या गरजा देखील महत्त्वपूर्ण आहेत ज्याणेंकरून आपण नेहमी प्रेरित आणि निरोगी राहतो. काही काळज्या चांगल्या तर काही वाईट. आपण कुठली घायची ते स्वतः वर अवलंबून जरी असले तरी त्याचा इतरांवर परिणाम होणे आलेच.
स्वत: ची काळजी घेण्याचे पाच प्रकार आहेत जसे की :
१. शारीरिक : फिटनेस, नटणे, पेहराव, मेकअप इत्यादी. झोपेची नियमित पद्धत विकसित करा. निरोगी आहार.
२. भावनिक : स्वतःचा शोध लावा. आपली क्षमता, गुण यांच्यावर विश्वास ठेऊन स्वतः वर प्रेम करा. मनावर अंकुश ठेवा, भुतकाळ विसरा. नकारात्मकता पासून दूर.
३. मनोवैज्ञानिक : नको त्या कामांना नको म्हणायला शिकणे, स्वतः च्या विचारांकडे ध्यान देणे, ऍटिट्यूड तयार करणे.
४. आध्यात्मिक आत्म-काळजी: मानलेल्या अध्यात्मिक गुरु किंवा देवदेवतांची आठवण करून मनातील भावना सुसंस्कृत ठेवणे.
५. व्यावसायिक : आपल्या स्टाफशी बोलणे, विचारपूस करणे. ऑफिसला आपल्या मूड प्रमाणे ठेवणे, काम आणि घर यामध्ये बॅलन्स इत्यादी ज्याणेंकरून पैसे आणि प्रॉडक्ट यांची काळजी घेणे सोपे होते. व्यावसायिकता व मानवधर्म ( Tata ) नेहमी मनी असुद्या.
दुसऱ्यांची काळजी घेणे सुद्धा आपले कर्तव्य आहे. त्याला कारण म्हणजे त्यांची मानसिकता ठीक नसेल तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. मग ती काळजी घेणे जसे त्यांचे काम तसेच आपण त्यांना सपोर्ट करणं हे आपलं.
१. लोकांच्या पाठीमागे त्यांच्या बाबत बोलू नये – उगीच नंतर भांडण, मनःस्थिती बिघडविणे, हे त्रास समाजाला पण घातक.
२. मदतीचा हात देणे – वेळप्रसंगी विचारपूर्वक प्रसंगानुसार पुढाकार घ्या. त्यांच्या मागे उभे राहा.
३. नको म्हणायला शिकणे – प्रसंगी आपण इतरांना नको त्या गोष्टीत साथ देणे टाळले पाहिजे. त्यांना नाही म्हणायचे कारणं पटवून द्या.
४. मीच मोठा – दाखवणे, शेखी मिरवणे – उगीच पैसा-अडका यांची श्रीमंती दाखवून इतरांना हिणवण्या पेक्षा मनाची श्रीमंती दाखवणे, आचरणात आणणे.
अशा खुप काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला व समाजाला माहित असून सुद्धा त्या पाळल्या न गेल्याने मानसिक आजार जडतात. तेंव्हा एकमेकांची काळजी घेतली तर आपलं कुटुंब आणि शेजारी, मित्र मंडळी, समाज आणि देश एकोप्याने राहील. एकाएकी बदल घडणे सोपे नाही, कारण एखादया गोष्टीची सवय लागण्यासाठी जवळपास २५ दिवसांचा कालावधी लागतो म्हणून निराश न होता लगे रहो. खूपच निराशाजनक काळजीत असाल तर मानसिक समुपदेशन जरूर घ्या त्यामुळे पुढील संभाव्य धोके टाळता येतील. ध्यानात ठेवा चांगली काळजी नेहमी गरजेची असते पण तिचा जास्त उपयोग चांगल्या निर्णयासाठी केला तर अजून छान.
होणार होतला जाणार जातला
मागे तू फिरू नको.
उगाच सांडून खऱ्याची संगत
खोट्याची धरू नको…
@श्रीकांत कुलांगे
9890420209