वर्तमान आणि आपण

आजपासून दिवाळी सुरू होतेय आणि आनंदी वातावरण निर्मिती अनुभुवायला आपण सुरुवात करतो. परंतु यावर्षी बहुतांशी लोक covid मुळे चांगल्यापैकी होरपळून गेल्यामुळे त्यांची दिवाळी अशितशीच असणार. तरीही आपण प्रयत्न करूया ज्यानेकरुन आपले आयुष्य इथेच न थांबता पुढील वाटचाली योग्य करू शकु. 

उत्तम आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी जी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे, त्यापैकी एक कौशल्य म्हणजे वर्तमानामध्ये जगण्याचे! हे कौशल्य काही गोष्टी करून मिळवता येईल.

१. परफॉर्मन्स वाढविण्यासाठी त्याबाबत विचार करणे थांबवा – विचार करण्याऐवजी वर्तमानामध्ये जी कृती करीत आहात, त्यावर लक्ष दिल्यास नक्की फायदा होतो.

२. भविष्याबद्दलची चिंता नको! वर्तमानावर फोकस करने. आतापर्यंत लक्षात आले असेल की भविष्यकाळातल्या ज्या ज्या समस्यांचा आपण विचार करीत होतो, त्यापैकी कित्येक समस्या तर प्रत्यक्षात उद्भवल्याच नाहीत.

३. भावनांच्या आहारी जाणं टाळणे आणि स्वत:वर पूर्ण नियंत्रण ठेवणं गरजेचे.

४. योग्य ध्येय – ध्येय योग्य प्रमाणात आव्हानात्मक असावे. वैयक्तिक क्षमतांच्या पलीकडे असणारे ध्येय मानसिक तणाव निर्माण करते.

५. पलायनवाद नकोच – एखादी अवघड समस्या उद्भवली, नावडती परिस्थिती निर्माण झाली की, ती टाळण्याकडेच आपला नैसर्गिक कल असतो.

६. कोणतीही भावना एकटी येत नाही. ती स्वत:सोबत इतर भावनांना सोबत घेऊन येते. या भावनांना ओळखणं आपण जेवढं सोपं बनवू, तेवढं वर्तमान सहज बनतं.

७. नवशिक्यासारख पाहणं. रोजच्या होणाऱ्या अनेक गोष्टी आपण गृहीत धरतो परंतु खूप नवीन बदल होत असतात जे आपल्या ध्यानात येत नाहीत.

 

भूतकाळ अगोदरच हातातून निसटून गेलेला. भविष्यकाळ अजून अस्तित्वात येणे बाकी! त्यामुळे जे आहे ते आताच आहे, इथेच आहे. हा वर्तमान जगलात की, खऱ्या अर्थाने आयुष्य जगलात. तरीही रोज आपण अनेक चिंता करत बसतो. ज्यामुळे अनेक प्रकारे मानसिक आजार जडण्याची शक्यता असते.

 

१. चिंता जगू देत नाही.

२. शारीरिक आजार संपत नाहीत.

३. पैश्याचा थांगपत्ता लागत नाही.

४. मुलं कधी मोठे झालीत तेही समजत नाही.

५. डोक्यावरील केसांची झुल्फे कधी विरळ झालीत ते ही उमगले नाही.

६. पोटाचा घेर प्रमाणापेक्षा बाहेर जातोय त्याची चिंता न करता, न पाहिलेल्या काळाची पर्वा करणं खरेच ठीक आहे का?

७. कौटुंबिक सुख असून न घ्यायची सवय कडून घेऊन उद्याची चिंता करण्यात काय शहाणपण?

८. उद्याची वाट पाहताना डोळ्याचा नैसर्गिक नियम बदलतो व चष्मा त्याची जागा घेतो. नंतर विसर्भोलेपणा वाढून तो चष्मा आहे कुठे याचेही भान राहत नाही..

 

एक ना अनेक व्याधी पाठी लागून आपण इतके बदलतो की जुनी मैत्रीण किंवा मित्र समोरून जात आहे हे देखील लक्षात येत नाही. वर्तमानात जगायचे तर आहे त्या परि्थितीत जसे आहे ते स्वीकार करून, आपल्या परीने त्याला पर्याय उपलब्ध करून पुढे जाण्यात मजा आहे. अर्थात आता यापैकी भरपूर जनजागृती झाली आहे. तरीही मानसिक स्वास्थ्य तपासणी मध्ये अनेकजण अजून सुध्दा भूतकाळात अडकलेली व उद्याची चिंता करणारी आढळून आली आहेत.

वर्तमानामध्ये जगण्याचं महत्त्व प्रत्येकाला माहीत आहे; पण ‘कसं?’ हीच मोठी समस्या आहे. म्हणून शिका व काळजी घ्या.

दिवाळी सणाच्या निमित्ताने आपण आपल्या कृतीतून सिद्ध करू शकतो की सकारात्मक बदल घडवून आपले वर्तमान अजून सुदंर करू. त्यासाठी खूप खूप शभेच्छा.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *