यशस्वी मानसिकता

 यश मिळत नाही म्हणून अनेक जण याबाबत चर्चा करायला येतात. अर्थात यश आणि नशीब यामध्ये नातं जोडून आपण प्रयत्नांना सोडून नशिबावर जास्त अवलंबून राहतो का यावर हसून गप्पा मारल्या. या लहान लहान गप्पांना कधी मोठं स्वरूप आले ते समजलेच नाही. यामधून काही गोष्टी नक्कीच पुढे आल्या त्या म्हणजे यश न मिळणे यामागील कारणे. 

१. कंटाळा. सांगकाम्या वृत्तीला औषध नसते.

२. इतरांना दोष देण्याची वृत्ती.

३. नशिबावर, हातांच्या रेषावर अती अवलंबून असणे.

४. नको त्या व्यक्तींचा सल्ला आणि चुकीची वेळ.

५. संशोधन वृत्तीचा अभाव.

६. काय चुकलं याचा अभ्यास न करण्याची वृत्ती.

७. आर्थिक टंचाई किंवा तसे समजण्याची वृत्ती.

८. खराब सवयी.

९. नकारात्मक मानसिकता.

१०. वेळेचे व्यवस्थापन आणि महत्त्व नसणे.

११. आरोग्याचे प्रश्न.

१२. न शिकण्याची कला.

ही लिस्ट संपता संपत नव्हती. गप्पांमधून सुरुवातीला आलेली मजा आता मात्र सीरियस वळणावर येऊन ठेपली. आता प्रत्येकाला अधीरता होती ती यशस्वी होण्यासाठी उपायांची. त्यासाठी सुध्दा लिस्ट बनवली गेली की काय करता येईल.

१. चांगल्या सवयी लावून घेता येतील का.

२. श्रीमंत लोकांच्या सवयी लावून घेता येतील का? उदा. सकाळी लवकर उठून, आवरून, सकाळीच कामाचा उरक करणं.

३. आवड कशात आहे हे ओळखून व त्यातच काही नवीन करता येईल का.

४. एक निश्चित ध्येय, एक मोठे लक्ष्य असणे अपेक्षित.

५. वेळेचा सदुपयोग करण्याची शक्ती निर्माण करून जतन करणे व योग्य प्रमाणात वापरणे.

६. ज्या कामात तुमच्या वेळेचा पुरपूर वापर होणार नसेल, ज्या कामातून तुम्हाला अपेक्षित असेलेले पैसे मिळत नसतील त्या कामांना नाही म्हणा!

७. शिका आणि विकास करुन घ्या. वाचन, मनन, चिंतन, मंथन याबाबत जागरूकता ठेवता येईल का.

८. टीव्ही हा एक सापळा आहे. त्याला टाळा!. एक तासापेक्षा जास्त वेळ नाही.

९. आपले आरोग्य व उत्साह सांभाळता येईल का. योग्य वजन, नियमित झोप, पुरेशी विश्रांती, योग्य आहार.

१०. मोजूनमापून, जाणीवपूर्वक धोका पत्करणे, याबाबत मानसिक तयारी.

११. आपले संपर्कक्षेत्र वाढवत न्या!

अजून जर कधी वेळ असता तर कदाचित हीच यादी आजुन वाढत गेली असती. यशस्वी होणे किंवा अपयशी ठरणे, हे कधीच अपघात नसतात. तुम्ही जे आहात, जसे आहात, ते केवळ तुमच्या स्वत:च्या विचारांमुळे आणि वर्तनांमुळे! कोणत्याही क्षेत्रात तुमचा भविष्यकाळ उजळून निघावा, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही स्वत:ला बदलणे आवश्यक आहे.

सुदैवाने, आपण आज जे काही आहात, तो आपल्याला जे काही शिकवले किंवा सांगितले गेले, त्याचा परिपाक आहे. आपण कधीही नव्या गोष्टी शिकण्याचा, नव्या सवयी अंगिकारण्याचा निर्णय घेऊ शकतो! त्यातूनच आपल्याला स्वत:चे वेगळे रुपच सापडू शकते.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *