जगणं आजचं

संजयला आजही समजत नव्हता आणि उद्याचीपण चिंता होती. त्यामुळे दिवसागणिक वाढत चाललेल्या चिंता त्याचं आयुष्य सुरळीत होऊ देत नव्हतं. अशा व्यक्तींना समुपदेशन करताना अनेक अडचणी येतात कारण ते थेरपी मध्ये सातत्य ठेवत नाहीत. त्याला आज आणि करिअर संबंधी पाहिलं समजाऊन सांगावं लागलं. 

काम करताना ते सुसह्य कसे होईल, याचा विचार आपण कायमच करत असतो. अगदी त्याचप्रमाणे एकदाच मिळणारे आयुष्य चांगल्या रीतीने जगण्यासाठीही नियोजनबद्ध असणे आवश्यक असते. कोणते नियोजन केले म्हणजे आयुष्याची आणि करियरची वाटचाल योग्य पद्धतीनं होईल?

१. ओझे मर्यादित असणं. अनेक लोक प्रवास करताना अकारणच भावभावनांचं प्रचंड ओझं घेऊन प्रवास करतात. ते कमी करायला हवे.

२. कोणाला सोबत घ्यायला हवं? आयुष्य म्हणजे परस्परसंबंध. जीवनात चांगल्या लोकांची संगत खूप महत्त्वाची असते.

३. आपल्याला कोठे जायचे आहे, हे आपण उद्दिष्ट ठरवून, योजना करून नक्की ठरवू शकता. आयुष्य म्हणजे केवळ उद्दिष्ट गाठणे नव्हे, तर आयुष्य हे आपल्याला जिथून निघायचे आणि जेथे पोहोचायचे आहे यांच्यामध्ये घडणारा प्रवास आहे.

४. बहुतेक जण थोडे दुराग्रही, हट्टी आणि गर्विष्ठ असतात. त्यांना आपण चालत असणाऱ्या दिशेची खात्री करून घेण्याची गरज वाटत नाही. विचारा, सल्ला घ्या. हट्टीपणा दूर ठेवणे चांगले.

५. आयुष्याची वाटचाल हे एक कौशल्याचं आणि कलात्मक काम आहे. आपल्याकडून घडलेल्या घटना किंवा चुका शंभर टक्के पुसता येत नाहीत; पण खूप उशीर होण्यापूर्वीच आपण यू टर्न घेऊन नवीन मार्गाने सुधारित प्रवास करू शकतो.

६. आपण जेवढे इतरांना देतो त्यापेक्षा अधिक आपल्याला परत मिळते, हा निसर्गाचा नियम आहे.

७. आयुष्याच्या वाटेवर अनेक आव्हाने, अडथळे यांचा सामना करावाच लागतो. या सर्व गोष्टींची दखल घेत काही आडमार्ग, वळणे यांचाही वापर करणे अपरिहार्य असते.

८. अधिक प्रवास केल्याने ज्ञानात मोलाची भर पडते.

९. आयुष्यात नुसतीच धावपळ आणि अतिकष्ट नको. पैसा कमावताना आयुष्य जगायला विसरू नका. धकाधकीच्या आयुष्यात स्वत:साठी, आप्तस्वकीयांसाठी थोडा वेळ काढा.

१०. आयुष्य म्हणजे देवाने दिलेली ठराविक काळापुरती जमीन आणि जवळपासची माणसं हे ध्यानात ठेवले तरी छान.

दूरदृष्टी ठेवून आपल्या मार्गात येऊ शकणाऱ्या धोक्यांचा विचार जरूर करायला हवा; पण त्यांना घाबरून माघार घेण्यापेक्षा त्यावर उपाय योजून पुढे जायला हवं; कारण आजची वेळ थोडी कठीण असेल, तरी उद्याच्या आयुष्यातील कित्येक सोनेरी क्षण आपली आतुरतेने वाटत पाहत असेल, हे विसरायचं नसतं.

 

© श्रीकांत कुलांगे

9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *