कौटुंबीक कलह आणि माझे कर्तव्य

अंजली आणि तिची मुलगी कौटुंबीक समस्या घेऊन आलेली. प्रॉब्लेम होता कौटुंबीक अंतर्गत कलह. अर्थात सौम्य ते गंभीर अशा कौटुंबिक समस्या कोणत्या ना कोणत्या वेळी प्रत्येक कुटुंबाला आव्हान देतात. हे कुटुंबातील वर्तनात्मक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे किंवा विशिष्ट धकाधकीच्या घटनांमुळे उद्भवू शकते. सामान्य कौटुंबिक समस्यांमध्ये काय समाविष्ट आहे? 

१. आर्थिक समस्या.

२. दु:ख.

३. अमली पदार्थांचे सेवन व दुरुपयोग

४. मुले आणि किशोरवयीन मुलांची वर्तणूकविषयक समस्या आणि शैक्षणिक चिंता

५. मानसिक आरोग्याची चिंता.

६. विभाजन, घटस्फोट किंवा एकत्रित कौटुंबिक विस्कळीतपणा.

७. जुने आजार.

८. सामाजिक त्रास.

प्रत्येक कुटुंबात अधूनमधून वाद असतो. तथापि ते कायमस्वरूपी असतील तर मात्र आपले कुटुंब अनस्थेकडे वाटचाल करते व ते विषारी बनते. आपले कुटुंब मानसिक आरोग्य खराब करणारे आहे हे कसे समजायचे?

 

१. ते मत्सर करतात किंवा दुसऱ्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतात.

२. अनावश्यक वादविवाद. ओव्हर रिअँक्ट.

३. नेहमी तुलना करणे.

४. कुटुंबीय उंच आवाजात जाब विचारतात जसे काही गुन्हा केलाय.

५. आपल्या सीमांचा आदर करीत नाहीत.

६. ते नेहमी बरोबर असतात व इतर चुकीचे.

७. नेहमी धमक्यांचा वापर.

८. अनावश्यक गोष्टी मनाला लागून घेणे.

९. घरात मन ना लागणे. शक्ती संपल्यासारखे वाटणे.

अशा कौटुंबीक वातावरणात जेंव्हा मुलं वाढतात त्यांच्यावर योग्य संस्कार होत नाहीत आणि पुढील पिढी समस्याग्रस्त होते. असे होऊ नये म्हणून बरेच सामाजिक संशोधन केले गेले.

१. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत होईल.

२. असणारे प्रश्न लिहून त्यावर चर्चा केल्यास सकारात्मक संदेश मुलांना जातो. वाद होत नाहीत.

३. काही झाले तरी कुटुंब महत्वाचे म्हणून कितीही टीका झाली तरी त्यावर मंथन होऊन शांतपणे स्विकारण्याची ताकद निर्माण करणे.

४. आपला गर्व जाऊ द्या. आदर ठेवा, द्या.

५. कुटुंबातील वाद कुणा एखाद्याल्या जिंकण्यासाठी नसावेत. कुटुंबात हार जीत नसते.

६. मूळ प्रश्न शोधून उपाय वाद ना घालता सामंजस्याने सोडवण्याचा सराव. चुका सर्वांकडून होतात.

७. वडीलधारी मंडळी सांगतात ते भल्यासाठी हे आपण आपल्या कृतीतून सिद्ध करू शकतो.

८. सामाजिक रूढी, परंपरा वेळेनुरुप बदलतात तो नैसर्गिक नियम. आपणही ठराविक बदल काळानुसार करणे आवश्यक.

९. संवादातून सुरक्षित व आनंदी संसाराकडे हा मंत्र. आरडा ओरडा करून नव्हे तर धिरता व संयम शिकल्यास व सराव केल्यास बऱ्याच शारीरिक, मानसिक व्याधी गायब होतील.

१०. चिंता आणि काळजी अनेक रोगांची जननी आहे.

कुटुंबातील जाणता राजा तोच जो सगळ्यांना एकत्र ठेऊन प्रगती करत राहतो. मानसिक शांती ही पैशापेक्षा श्रेष्ठ. त्यासाठी जगा पैशासाठी नाही. जो स्वताच्या कुटुंबाचा नाही होऊ शकत तो इतरांचा कसा हा प्रश्न साहजिक असतो. ज्याने विचारपूर्वक निर्णय, तारतम्य, परिस्थितीचे भान ठेवले तोच आपले जीवन सार्थकी लावतो हे ध्यानात आले तर कौटुंबीक कलह आणि समस्या संपून जातील.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *