स्त्री आणि संभाषण कला
अनेक मुलींच्या किंवा सूनांच्या आयुष्यात केवळ चांगला संवाद न केल्याने वादळाचा सामना करावा लागतोय ही वस्तुस्थिति नाकारता येत नाही. स्नेहाला याच बाबतीत समुदेशन करताना अनेक पैलूंवर चर्चा झाली. जे लोक मुलींचे पालनपोषण करून त्यांना शिकवून मोठे करतात व तिचे लग्न करून देणे हे पुण्याचे काम समजतात, तेसुद्धा सदैव चिंतेने ग्रासलेले असतात. सासरच्या लोकांचे समाधान होईल, …