सवय आणि नियंत्रण
आज सकाळी जेव्हा तुम्ही उठलात, तेव्हा प्रथम काय केलंत? आंघोळीला गेलात, तुमचे इ-मेल, मेसेजेस पाहिलेत? तुम्ही तुमचे दात आंघोळीच्या आधी घासलेत की नंतर? पहिल्यांदा डाव्या किंवा उजव्या बुटाची नाडी बांधलीत? कामासाठी बाहेर पडताना तुम्ही तुमच्या मुलांशी काय बोललात? तुम्ही ऑफीसला कोणत्या रस्त्याने गेलात? तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये तुमच्या टेबलपाशी पोहोचलात, तेव्हा प्रथम तुमच्या इ-मेलना उत्तरे दिलीत, …