श्रद्धा आणि आपण
घटक आणि तणावनिर्मिती यांचा अभ्यास व या बाबतीतील प्रयोग असं सांगतात की, अत्यंत धार्मिक आणि श्रद्धावान लोक हे अत्यंत तीव्र ताणसुद्धा सहजगत्या सहन करतात. असं का? शास्त्रीयदृष्ट्या, श्रद्धेमुळं आपला आनंद, उत्साह वाढविणाऱ्या एन्डॉर्फिन्सचं रक्तातील प्रमाण वाढतं. शरीरातील अंत:स्रावी ग्रंथींच्या स्रावावरही याचा चांगला परिणाम होतो. शरीरातील अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण करणाऱ्या चेतासंस्थेचं कार्य सुधारतं. फारसा गंभीर आजार …