परिवर्तनीय विचार
“आजकाल फक्त पाहत राहायचं आणि अप्रिय गोष्टींना सहन करण्या शिवाय पर्याय नाही” असं म्हणत साठीतील मॅडम समुपदेशन साठी आल्या होत्या. त्यांना शांत करता करता मनात अनेक विचार डोकावून गेले. सध्याच्या गतिमान आणि तीव्र स्पर्धेच्या काळात दैनंदिन जीवन जगताना ताणतणावांना, संघर्षाला तोंड देताना अनेकांची ‘मनःस्वास्थ्य’ शब्दाशी फारकत होताना दिसते. मनाप्रमाणे गोष्ट झाली नाही किंवा अपेक्षाभंग झाला …