अंतर्मनातील अशांतता

 

वेडेपणाचे कारण काय आहे? असा प्रश्न काल एका वेबिनर वर विचारण्यात आला. याचे योग्य उत्तर कोणालाही माहीत नाही, पण भीती आणि चिंता याचे या आजारासाठी खूप मोठे योगदान असल्याचे कोणी नाकारू शकत नाही. हैराण आणि अस्वस्थ असलेली अशी व्यक्ती या जगातील कठोरपणा सहन करू शकत नाही आणि मग ती आपल्या भोवतालच्या वातावरणाशी आपला संपर्क तोडून टाकते. स्वत: निर्माण केलेल्या कल्पनेच्या आणि स्वप्नाच्या जगात रममान होते. अशा प्रकारे तो आपल्या चिंतेच्या समस्या सोडवून टाकतो. आपण त्यालाच वेडेपणा म्हणतो.

म्हणून चिंता आणि भीती याबाबत आज सर्वाधिक जनजागरण होत आहे. रोजच्या जगण्यात या दोन्ही गोष्टी आपल्यावर हानिकारक हल्ले चढवत असतात. ते कुठल्याही मार्गाने येतात व नुकसान करून जातात. चिंता, काळजी, तिरस्कार, द्वेष, भीती यामुळे आपण आपल्या मनाचे आणि शरीराचे कशा प्रकारे नुकसान करीत असतो, किंवा जर सातत्याने चिंता करण्याची सवय असेल तर मात्र खाली दिलेल्या नोंदी जरूर वाचा.

१. चांगल्यात चांगल्या व्यक्तीला आजारी करण्याचे काम चिंता करते.

२. ‘चिंता, भीती, आणि सतत कोंडमारा करणार्‍या भावना, यामुळे शरीरातील कॅल्शियमचे संतुलन बिघडू शकते.

३. चिंतेमुळे दातांचे विकारही होऊ शकतात.

४. पोटाचे विकार, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, हृदयरोग यालाही करणं हेच.

५. आर्थराईटस होण्याची मुख्य कारणे आहेत, आर्थिक नुकसान किंवा दु:ख, एकाकीपणा आणि चिंता, दीर्घकाळ वाटणारा तिरस्कार.

६. चिंता आपला जबडा संकुचित करते आणि त्यामुळे चेहर्‍यावर रेषा पडतात. भुवया कायमस्वरुपी वर चढलेल्या राहतात. आपल्या रंग रुपावरही वाईट परिणाम होतो. यामुळे त्वचेवर अनेक प्रकारचे फोड, चेहर्‍यावर डाग येऊ शकतात.

७. चिंता आत्महत्येचे कारण आहे.

८. ज्या व्यवसायिकांना चिंतेशी संघर्ष करता येत नाही, ते तरूणपणीच मृत्यूला कवटाळतात ही वस्तुस्थिती आहे.

आपण सभोवतालच्या कोलाहलात आपल्या अंतर्मनातील शांतता कायम ठेवू तर आपण नर्व्हस आजारांपासून आपला बचाव करू शकतो.

मग यावर उपाय काय? तर मनोरंजन आणि विश्रांती. त्या व्यतिरिक्त सर्वमान्य पद्धती खालील प्रमाणे आहेत,

१. आरोग्य निगा, नियमित व्यायाम व योगा.

२. देवावर, कर्मावर श्रद्धा.

३. चांगल्या प्रकारे झोपायला शिकणं.

४. चांगल्या संगीताचा आस्वाद घेणं,

५. जीवनातील गमतीदार बाबी पहा. हास्य कायम हवं.

६. वेळेवर समुपदेशन योग्य.

७. आनंदी राहिल्यामुळे शरीराला आजाराशी संघर्ष करण्यासाठी सामर्थ्य मिळते हेही सत्य.

८. वास्तवाचा सामना करणं शिकावं लागेल. त्याशिवाय कुठलाच पर्याय नाही.

९. मनाला कायम सकारात्मक सांगत राहणं.

सांगणं सोपं पण त्याला फॉलो करणं तितकच अवघड हे सर्वत्र ऐकायला मिळते. जेंव्हा कुठेच आशेचा किरण नसतो तेंव्हा आपल्या हातात फक्त प्रयत्न करणं हेच असतं. ते प्रयत्न म्हणजे नेमकं काय, तर वर दिलेल्या काही नोंदी follow करणं होय. हृदय विकार, जठराचा अल्सर, डायबेटीस, इ. ठराविक आजार म्हणजे भावंडे आहेत. एक दुसर्‍याला सोडून न राहणारी. एक भेटला की हळूहळू सर्व भेटायला येतात. कुठेतरी वेळेवर ही साखळी तोडायला हवी. म्हणून जबाबदारी घेऊन अगोदरच आजारांना ओळखुन त्याच्या पासून दूर राहण्यात हित आहे, हो की नाही?

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *